⍐                    प्रगत                   ⍗



                      → कोणता विद्यार्थी प्रगत. 


                      → कोणता वर्ग प्रगत. 


                       → कोणती शाळा प्रगत.



याची निश्चिती करणारे लिखित व शासन निर्णय PDF स्वरूपात

  ⇒ लिखित  ↷


                           
 दि.७ सप्टेंबर २०१७ पासुन संपुर्ण महाराष्ट्रात पायाभूत चाचणी मराठी,गणित,इंग्रजी,सा.विज्ञान विषयाची शाळा स्तरावर घेत आहोत.यावर्षी पासुन भाषा व गणित विषयात मूलभूत क्षमता प्रश्नांला मध्ये ७५% गुण व इतर प्रश्नांला ६०% गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्यांना आपणास पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी मध्ये प्रगत समजायचे आहे.इंग्रजी व सा.विज्ञान विषयासाठी मूलभूत क्षमता अभिप्रेत नाहीत.त्यामुळे इंग्रजी, सा.विज्ञान विषयात ६०% गुण मिळाले तरीही विद्यार्थी प्रगत समजला जाईल.चाचणीचा शासन निर्णय दि.१४.०७.२०१७ पेज क्रमांक ३ वर कलम १.४ मध्ये मुलभूत क्षमतेची स्पष्ट व्याख्या केलेली आहे.
*भाषा विषयासाठी वाचन व लेखण,गणित विषयासाठी मूलभूत क्षमता ऐकुण संख्या लेखण,संख्याची तुलना, विस्तारीत रुप,स्थानिक किंमत,बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रीयांचा अंर्तभाव केलेला आहे.फक्त  मराठी व गणित विषयाचा स्पष्ट उल्लेख आहे.*
  वाट्सअप वर येणार्‍या पोस्टचा आधार पेपर तपासणी साठी घेऊ नये.प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे वर्गीकरण शिक्षकांना करावे लागेल. 


PDF  स्वरूपात  ↷


शासन निर्णय      --      CLICK



















कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें